26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeमुख्य बातम्याकर्नाटकी ‘पॉलिट्रिक्स’मध्ये ‘डिनर डिप्लोमसी’चा फंडा

कर्नाटकी ‘पॉलिट्रिक्स’मध्ये ‘डिनर डिप्लोमसी’चा फंडा

बेळगाव : वृत्तसंस्था
कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकारमधील मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गटात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार राजकीय कवायती सुरू आहेत. दरम्यान, सिद्धारामय्या आणि डी.के. शिवकुमार यांची नेतृत्वबदलावरून दिल्ली वारी देखील झाली. हायकमांडच्या निर्देशानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ देखील रंगली.
मात्र आता सिद्धारामय्या यांच्या जवळचे समजले जाणारे सतीश जारकीहोळी यांनी गुरूवारी रात्री बेळगावमध्ये कुवेम्पू नगरमधील आपल्या घरीच मुख्यमंत्री सिद्धारामय्या गटातील नेत्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ही डिनर डिप्लोमसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील पॉवर शेअरिंगच्या अरेंजमेंटवरून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर होत आहे. कर्नाटक सरकार स्थापन होत होतं त्यावेळी काँग्रेस लीडरशिपचा एक फॉर्म्युला ठरला होता.मात्र आता सिद्धारमैय्या यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. हायकमांडने मला पाठिंबा दिला होता असे वक्तव्य करून खळबळ निर्माण केली आहे. आता यावर डीके शिवकुमार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या डिनर पार्टीला मुख्यमंत्री सिद्धारामय्या, गृहमंत्री जी परमेश्वर, मंत्री एचसी महादेवप्पा, मंत्री जमीर अहमद खान आणि आमदार पोनन्ना यांच्यासह अजून दोन ते तीन आमदार सहभागी झाले होते. सिद्धारामय्या आणि महादेवप्पा हे एकाच गाडीतून जारकीहोळी यांच्या घरी पोहचले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जारकीहोळी यांच्या या डिनर डिप्लोमसीमध्ये नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले जर नेतृत्वबदल होण्याची चर्चा सुरू झाली तर तुम्ही सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडू नका. मिळालेल्या माहितीनुसार जर सिद्धरामय्यांना हटवले तर काँग्रेसच्या मागासवर्गीय वोटबँकला मोठा फटका बसू शकतो असा इशारा देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR