किल्ले सिंहगडावर दोन गटात राडा; व्हिडीओ व्हायरल 

पुणे : प्रतिनिधी
सुटीसाठी अनेकदा राज्यातील लाखो पर्यटक प्रसिद्ध किल्ल्यांना भेट देतात. जेव्हा, मोठ्या सुट्ट्या असतात तेव्हा अनेकदा प्रचंड गर्दी किल्ल्यांवर पाहायला मिळते. मात्र, या गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था नसल्याने पर्यटकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो.

१५ऑगस्टचे औचित्य साधून पुण्यातील किल्ले सिंहगडावर फिरण्यास गेलेल्या एका कुटुंबाला मात्र वेगळाच अनुभव मिळाला. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये सिंहगडावर दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुणांनी तरुणींशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकार समोर आल्याने हा वाद झाला. या संपूर्ण घटनेने सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे पाहायला मिळाले.

सुरक्षारक्षक किंवा पोलिसांची पुरेशी उपस्थिती नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्याचेही यावेळी दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेतला तरुण महिला, मुली यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा जाब विचारला असता दोन गटांत वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सिंहगडावर हे सर्व घडत असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे पोलीस किंवा कोणतेही सुरक्षारक्षक नव्हते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news