गरजू शालेय विद्यार्थीनींना सायकल वाटप

परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी सोशल मीडियाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून जयंती निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी विविध शाळेतील १० गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थीनींना शिक्षणासाठी ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. मागील वर्षी महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन वाटप करण्यात आले असून या सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा दरवर्षी जपत समाजातील वंचित, गरजू आणि होतकरू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प परभणी सोशल मीडियाने केला आहे.

आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे तर स्वागताध्यक्ष शिवसेना तालुकाध्यक्ष प्रभाकर कदम होते. यावेळी मध्यवर्ती बँकचे संचालक मेहराज खान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, कमलकिशोर अग्रवाल, डॉ. गोविंद कामटे, संतोष देशमुख, ऋषी दांडेकर, पप्पू गायकवाड, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना परभणीचे नाना चट्टे, मकसूद पठाण, शेख सलमान, शिवसेना संपर्क प्रमुख सखुबाई लटपटे, शिवसेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अर्चना चिंचाणे, कमल राठोड, कल्पना दळवी, अनुराधा टाक, मीरा इगवे, मालन धोत्रे, उषा बिडवे, गौरी धबाले, पूजा कांबळे, प्रियंका वाघ, पिंटू गडदे, विलास राठोड, गोविंद गिरी, विष्णू वैरागड, मुकुंद धबाले, राहुल शिवभगत, सुरेश पाचपुंजे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी जयंती कमेटीचे राहुल धबाले, राजू कर्डिले, बालाजी कांबळे, नजीब सिद्दिकी, धनंजय धबाले, सय्यद जमील, बाळासाहेब घिके, संदीप लहाने, रियाज कुरेशी, विष्णू सायगुंडे, शंकर झटे, सय्यद खिजर, शेख इस्माईल आदींनी परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45

Latest news