थारने धडक देऊन युवकाची निर्घृण हत्या

पूर्णा : (जाकीर पठाण)

तालुक्यातील गौर येथील २२ वर्षीय तरुणाची दि. ३१ जुलै रोजी भरदिवसा थार गाडीने धडक देऊन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्या भांडणातून, मारामारीच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध खुनाचा कट रचल्याचा आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या संदर्भात शिलाबाई बालाजी सावळे (वय ४५) रा. गौर यांनी चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा संतोष बालाजी सावळे (वय २२ वर्षे) हा दि. ३१ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास बुलेट मोटरसायकल (क्र. एमएच २२-९११३) घेऊन पूर्णा येथे जात होता. दरम्यान, रायबा हॉटेल पुढील वेल्थ बार रेस्टॉरंटजवळ पाठीमागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या थार गाडीने संतोषच्या बुलेटला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संतोष गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर जखमी संतोषला उपचारासाठी तातडीने नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शिलाबाई साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुशिल केशव पारवे, रितेश काळबांडे, दीपक भगवान पारवे, श्रीधर दगडूजी पारवे, प्रल्हाद आनंदराव पारवे, आनंताराव त्र्यंबक पारवे, गोरखनाथ दिगांबर पारवे, नवनाथ रामा पारवे, बालाजी सोपान पारवे, आलेखार तुकाराम पारवे, प्रताप प्रकाश ढेपे, महेश पारवे, वैभव मोहन पारवे (सर्व रा. गौर, ता. पूर्णा) व इतर साथीदारांनी मिळून योजनाबद्ध कट रचून संतोष याच्यावर जीवघेणा हल्ला करून हत्या केल्याचे म्हटले आहे. संतोष सावळे याने यापूर्वी आरोपींविरुद्ध मारामारीचा व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून हा कट रचल्याच्या तक्रार केली आहे. तसेच घटनेच्या वेळी चुडावा पोलीस ठाण्याचे कर्मचारी चंद्रमुनी हानवते हे याच भागात पेट्रोलिंग करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्यात अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमोर, पूर्णाचे पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या तपासाची सूत्रे वाघमारे यांच्या देण्यात आली आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news