ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; दुचाकी चोराला अटक ; ३ दुचाकी जप्त

नांदेड : प्रतिनिधी
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली.त्याच्याकडून ३ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मनोज दिनकर सदार ( रा. पंचशील बुद्ध विहारजवळ, हडको) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
आरोपीकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली . पुढील तपासात आरोपीच्या घरातून आणखी २ दुचाकी आढळून आल्या. त्या वाहनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांकडे चोरीचे गुन्हे दाखल आहेत का? याची पडताळणी सुरू असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार जाधव तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने केली.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करण्याचे, दुहेरी लॉकचा वापर करण्याचे तसेच परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45

Latest news