लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १० मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. यासोबतच त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन निवेदने व निमंत्रनाचा स्वीकार करीत पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना केल्या.
यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, सभापती जगदीश बावणे, ट्वेन्टी वन शुगर्स व्हाईस चेअरमन विजय देशमुख, बालाजी वाघमारे, ओमप्रकाश पाटील, सुपर्ण जगताप, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, अरविंद पाटील, सुधीर गोजमगुंडे, सत्यवान कांबळे, डॉ. अरविंद भातांब्रे, प्रशांत रेड्डी, विजयकुमार धुमाळ, उपसरपंच गोविंद देशमुख, प्रा. संजय ओहोळ, व्यंकटेश पुरी, सुरेश गायकवाड, लक्ष्मण अंकुशे, वाल्मीक वाघ, सुधाकर माने, इसाक शेख, निलेश कांबळे, नागेश उपाडे, अमर भोसले, संतोष भोसले, महादेव शिंदे, उषा शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, संस्था संघटना पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

