मोफत आरोग्य शिबिर, ३२० हून अधिक महिलांची तपासणी

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व आरोग्यसेवेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ८ मधील महालक्ष्मी मंदिर, गांधी चौक, लातूर येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार या आरोग्य शिबिरामध्ये महिला कॅन्सर पूर्व तपासणी, स्त्रीरोग तपासणी, पाळीचे आजार, गर्भाशयाचे आजार, पिशवीचे आजार तसेच रक्तदाब तपासणी यांसारख्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील तब्बल ३२० पेक्षा अधिक महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत मोफत वैद्यकीय मार्गदर्शन व मोफत औषधोपचार पुरवण्यात आले.
या प्रसंगी लातूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल श्रीकांत उटगे, व्हीडीएफ स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे, मनपा सदस्या सानवी झिपरे, मनपा सदस्य अभिषेक पतंगे, मनपा सदस्या रिहानबेगम घंटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता पाटील, डॉ. साक्षी राजमाळे, डॉ. राजश्री गिते तसेच जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना आरोग्यविषयक तपासणी व मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना वेळेवर तपासणी आणि योग्य सल्ला मिळावा यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे, आशिष सदाकाळे, विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ऐश्वर्या पाटील यांनी केले, तर शेवटी बालाजी झिपरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news