शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतक-यांची अवस्था बिकट 

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तालुक्यात प्रत्यक्ष पेरणी झालेल्या २५ हजार ७९६.४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे गतवर्षी ओल्या दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतक-यांवर यंदा कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. खरीप हंगाम हातचा जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतक-यांचे शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
      तालुक्यात २८ हजार ३६७ हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून तालुक्याची सरासरी खरीप पेरणी २६ हजार ५७६ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात २५ हजार ७९६.४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीची टक्केवारी ९७.०६ टक्के आहे.सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने शेतक-यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत पिके सुकून गेली आहेत.
  तालुक्यात यंदा सोयाबीनचा सर्वाधिक २२ हजार ६०२ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ तूर ३ हजार ४८ हेक्टर, उडीद २८७ हेक्टर, इतर तृणधान्ये ६१.५० हेक्टर, ज्वारी २० हेक्टर, मूग ५.१३ हेक्टर आणि मका ५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांचा पेरा करण्यात आला आहे. सोयाबीन हे तालुक्यातील प्रमुख खरीप पीक असल्याने पावसाच्या खंडाचा सर्वाधिक परिणाम या पिकावर झाला आहे. अनेक शेतशिवारात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळली असून, काही ठिकाणी शेंगा भरण्यापूर्वीच पिके करपली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतक-यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news