होजई : सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आसामच्या होजई जिल्ह्यातून जात असताना आठ हत्तींना धडकली. या अपघातात आठ हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अपघातावेळी सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसचे इंजीनसह पाच डब्बे रूळावरून घसरले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
नॉर्थ-इस्ट फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की हा अपघात पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी झाला असून हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सैरंग, ऐझवाल भागाला नवी दिल्लीशी जोडते.
१० वर्षात १८६ हत्तींचा बळी
राज्य हत्तींची संख्या
आसाम ६२
प. बंगाल ५७
ओडिशा २७
उत्तराखंड १४
केरळ ९
झारखंड ७
तामिळनाडू ५
कर्नाटक ३
त्रिपुरा १
उत्तर प्रदेश १

