27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeलातूररासेयो स्वयंसेवकांनी देश आणि समाजाप्रती सेवावृत्तीने काम करावे

रासेयो स्वयंसेवकांनी देश आणि समाजाप्रती सेवावृत्तीने काम करावे

लातूर : प्रतिनिधी
रासेयो स्वयंसेवकांनी देश आणि समाजाप्रति सेवाभाव जोपासावा. विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्नांची जाणीव ठेवून कार्य करावे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, रक्तदान व अवयवदानाबाबत जागृती करावी, महापुरुषांचे विचार समाजात रुजवावेत. तसेच व्यसनमुक्ती आणि नशामुक्ती अभियान राबवून सामाजिक परिवर्तन घडवून आणावे. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रमांची मालिका नसून व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रभावी मंच आहे, अस प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागामार्फत आयोजित विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन जमालपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. ‘शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास’ या संकल्पनेवर आधारित हे सात दिवसीय शिबिर दि. १९ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. नागनाथ काळे, माजी सरपंच श्री. गंगाधर साळुंके यांची उपस्थिती लाभली. तसेच मंचावर प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव आलगुले, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. दिलीप गुंजरगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्रा. घार यांनी विद्यार्थ्यांनी संविधानिक मार्गाने समाजातील समस्या सोडविण्याची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. अशा शिबिरांच्या माध्यमातून स्वयंशिस्त, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते. श्रमदानातून शेतक-यांना मदत करणे, परिसर स्वच्छता राखणे, गरजू नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे हेच या शिबिराचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सात दिवसीय शिबिरामध्ये वनराई बंधारे बांधकाम, ओसाड भूमी विकास, परिसर स्वच्छता अभियान, महिला सशक्तिकरण, नशामुक्ती जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, ई-कॉमर्स व डिजिटल मार्केटिंग मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, बालविवाह प्रतिबंध जनजागृती आणि रस्ता सुरक्षा अभियान असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान व जनजागृती उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव आलगुले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अरुण साळुंके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजाभाऊ पवार, डॉ. अविनाश पवार, डॉ. दिलीप गुंजरगे, प्रा. शिवराज बाजुळगे, डॉ. रिता कदम, डॉ. रामेश्वर स्वामी, श्री. रामदास जाधव तसेच रासेयो स्वयंसेवक शीतल पवार, जयश्री जमादार, अमर खुणे, ऋषिकेश कांबळे, संदीप आडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR