सर्जा-राजाच्या साजाने बाजार फुलला

लातूर : प्रतिनिधी
भारत हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैल पोळयाचे महत्व अजूनही कायम आहे. शेतक-यांसोबत वर्षभर शेतात राबणा-या बैलांचा आज साजरा होणार आहे. त्यामुळे विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा बैल पोळ्याच्या साहित्यात वाढ झाली आहे.
बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्याच्या दिवशी मोठया उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त  करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा असलेला शेतक-यांच्या सर्जा-राजाचा सण पोळा हा शुक्रवारी २२ ऑगस्टला मोठया उत्सवात साजरा होणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी शहरातील बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. वर्षभर आपल्याला साथ देणा-या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा दरवर्षी मोठया प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करतो. या सणाच्या पार्शवभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणारे दोर, झुली, बाशींग, मोरखी, गोंडा, भोरकडी, पायातले घुंगरु, कंडे, फुलांच्या माळा, कंडी, रंग, यासारखे १५० ते २०० विविध प्रकाराचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. शहरातील बाजारात साहित्य ५० ते २००० रुपये दराने विक्रीसाठी दाखल झाले आहे.
लातूरच्या बाजार पेठेत बैलांच्या साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. यात घुंगरू २०० ते २००० रूपये किलो, पैंजन ५० ते ४०० रूपये, कासरा ३५० रूपये, म्होरकी ५० ते ४०० रूपये, कंठे ६० ते १०० रूपये, मटाटी १०० ते १००० रूपये, वार्णीस ४० ते ६० रूपये, कमरी १०० ते १००० रूपये दराने विक्री केली जात आहे. तसेच बैलांच्या शिंगना लागणारे विविध कलरचे वारणीसही बाजारात विक्रीसाठी आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news