१७ ऑगस्ट रोजी शिवछत्रपती विश्व सन्मानदिन आग्य्रात साजरा होणार 

लातूर : प्रतिनिधी
आठरा पगड जातीला एकत्र करून जुलमी राजवटीच्या विरुद्ध स्वराज्याचे स्वप्न पाहून, रयतेच्या सुखासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करून प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली. शौर्य, न्याय, पराक्रम यामुळे सारे जग ज्यांच्याकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते, असे विश्व भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी स्वत: व  छत्रपती संभाजी महाराज यांची शिताफीने आग्रा येथून औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेतली. म्हणून हा दिवस विश्व सन्मान दिन म्हणून आग्रा येथे साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार शाहू महाराज, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व इतर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे परिपत्रक विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा, नवी दिल्ली यांच्या वतीने मुख्य आयोजक डॉ. जनार्दन पाटील यांनी प्रसिद्ध दिले आहे.  या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बी. के. सिंह आग्रा, डॉ. जनार्दन पाटील, डॉ. ए. एस. सचान, डॉ. संजीव कुमार, जय शंकरराव हैदराबाद, बन्सीधर नाईक, डॉ. अखिलेश कुमार, रामदास पवार, अँड. उदय गवारे, प्रा. शिवाजी उगिले, प्रा. दत्ता सोमवंशी, सुपर्ण जगताप, अँड. सुशील सोमवंशी, विश्वंभर भोसले आदींनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news