५ हजार ६५० मतदारांची नावे यादीतून वगळली

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत एकूण ५ हजार ६५० मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण मतदारसंख्या ७३ हजार ४८१ वरून ६७ हजार ८३१ इतकी झाली आहे, अशी माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.

मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने संबंधित स्तरावर मतदार यादीची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित मतदार, दुबार नोंद असलेली नावे तसेच इतर कारणांमुळे अपात्र ठरणा-या मतदारांच्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यानंतर नियमाप्रमाणे ५ हजार ६५० मतदारांची नावे वगळण्यात आली. यापूर्वी जळकोट तालुक्यात ७३ हजार ४८१ मतदार नोंदणीकृत होते. वगळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता ६७ हजार ८३१ मतदार मतदार यादीत शिल्लक आहेत. मतदार यादीतील नोंदी अचूक राहाव्यात आणि पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी प्रशासनाकडून ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दरम्यान, मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये काही त्रुटी आहेत का, याची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासोबतच चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी संबंधित निवडणूक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

एसआयआर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, नायब तहसीलदार रंगनाथ कराड, सहाय्यक गटविकास अधिकारी रोहित देडगे, मुख्याधिकारी रोहित आरबोळे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील आणि गटशिक्षणाधिकारी रश्मिता साहू यांनी वेळोवेळी आढावा घेतला. तसेच बीएलओ पर्यवेक्षक एस. बी. तिडके, सचिन काडवादे, एम. एस. पाटील, एम. व्ही. हंगरगे, के. पी. बिरादार, बालाजी काटे आणि व्यंकट आंदे, सुधाकर बुक्के यांनी बीएलओंच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले. तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिका-यांनी देखील मोलाची भूमिका बजावली. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे अलीम शेख, शेख आर. पी. तसेच इतर कर्मचा-यांनीही बीएलओंच्या अडचणी तातडीने सोडवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
04:28
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये सोयाबीन पिकावर संकट!दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांची मागणी
01:53
Video thumbnail
Latur|जगायला बळ द्या, अन्यथा मारून टाका!” शिरूर अनंतपाळमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश
03:37
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
09:37
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36

Latest news