लातूर : प्रतिनिधी
डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचा-यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दि. २० जुलै रोजी राज्यभर पुकारण्यात आलेले आरोग्य सेवा बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या सूचनेनुसार आणि न्यायालयाच्या आवाहनाचा आदर राखून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी दिली. त्यामुळे सर्व दवाखाने आणि आरोग्य सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
















