आठवड्यात ६ तर, वर्षभरात ५४ वाघांचा मध्यप्रदेशात बळी

भोपाळ : वृत्तसंस्था
‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणा-या मध्य प्रदेशमध्ये वाघांच्या मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत (१३ डिसेंबरपर्यंत) तब्बल ५४ बाघांचा मृत्यू झाला असून, १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या एका आठवड्यातच राज्यात ६ वाघांचे मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या ५४ वाघांच्या मृत्यूपैकी तब्बल ३६ मृत्यू रहस्यमय असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. काही घटनांमध्ये वाघांचे पंजे कापून तस्करांनी नेल्याचेही आढळल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय तस्कर बाजारात एका वाघाची किंमत सुमारे १ ते ३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

वाघाच्या मृत्यूची ताजी घटना बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आहे. उमरिया जिल्ह्यातील चंदिया वनपरिक्षेत्रातील कथली नदीच्या काठावर एका वाघाचा मृतदेह आढळला. संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, चौकशी सुरू आहे. वन कर्मचारी नियमित गस्त आणि जनगणना करत असताना ही घटना उघडकीस आली.

राजकीय आरोप-प्रत्यारोप
वाघांच्या सुरक्षेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेश सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिनव बारोलिया यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. दरम्यान, वन राज्यमंत्री दिलीप सिंह अहरवार यांनी वन विभाग सर्व प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करत असल्याचे सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news