मुंबई : ( प्रतिनिधी)
खासदारांनी आमच्या समोर शपथ घेतल्या, कोणी आई, कोणी मुलीची तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. पण अर्ध्या रात्री गायब झाले. आता गद्दार खासदारांना सोडणार नाही, राज्य आता गप्प बसणार नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे, असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला आहे.
ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आज संजय राऊत, गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. जुन्या स्टाईलनं फुटीर नेत्यांना खडेबोल सुनावले. जे खासदार उद्धव ठाकरेंच्या चेह-यावर आणि मशाल चिन्ह्यावर निवडणून आले त्यांना अशा बेईमानी करण्याचा अधिकार नाही. त्यांना असं सोडून जाणं ते सोपं नाही. उद्धव ठकारेंना सोडून जाणा-यांच्या रक्तात बेईनामी असल्याचं राऊत म्हणाले.
एका खासदारान तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं आईची दुस-यानं मुलीची शपथ घेतली आणि निम्म्या रात्रीच गायब झाले. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोन करून मला महाराष्ट्रातील खासदारांची विक्री होत असल्याचं सांगितलं. प्रत्येकाला ५०-५० कोटी रुपये देण्यात आलेत. त्यातील ऍडव्हन्स म्हणून १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर चाटर्ड प्लेन दिल्ला नेण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
















