मुंबई : प्रतिनिधी
नॉट रिचेबल असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी नुकतेच प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता ओमराजे यांनी,‘मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही’ असे सूचक उत्तर दिले.
महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार असून महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाईल, राजाभाऊ वाजे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल.हा नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही’ दरम्यान कोणाच्या संपर्कात नसलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांनी टीव्हीमाध्यमांशी संवाद साधला.
तुम्ही दिल्लीला आहात का? तुम्हाला तानाजी सावंत दिल्लीला घेऊन गेले का? या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांनी उत्तर देत म्हणाले,‘मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत असही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? यावर ओमराजे निंबाळकर यांनी थेट उत्तर देणे टाळले.
















