34 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रउज्ज्वल निकम यांनी फोडला प्रचाराचा नारळ

उज्ज्वल निकम यांनी फोडला प्रचाराचा नारळ

मुंबई : मुंबईत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलीय. सध्या या मतदारसंघात भाजपच्याच पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. त्यांचे तिकीट कापून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन घेतलं. त्यानतंर शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलं तर दादरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातही ते गेले.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, मी जे शक्तीस्थळ जोपासली त्यातलं हे एक स्थळ आहे. बाळासाहेब यांनी माझ्यावर प्रेम केले. मला बातमी वाचून फोन करायचे, भेटायला बोलवायचे. त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

उज्ज्वल निकम पुढे असंही म्हणाले की, मतदार हे उद्धवजी आहे आणि मी त्यांना भेटण्याच प्रयत्न करेन. मला मतदान करावं अशी मी विनंती करेल. मी वकील असल्याने मला त्यांचे मत परिवर्तन करता येईल, मी उद्धवजींचे मत वळवेल याची मला खात्री आहे. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. कोणाला भेटावं याला बंधन घालत येत नाही. राजकारणातून सामान्य माणसाचं प्रश्न सोडविता येतात त्यामुळ मी हा निर्णय घेतला असंही त्यांनी सांगितले.

पूनम महाजन यांना डावलून उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, मी माझ्या प्रचाराची सुरुवात करतोय आणि प्रत्येक गोष्टीतून वाईट अर्थ काढू नये. पूनम महाजन यांना कदाचित पक्ष नवी जबाबदारी देईल. मी याबद्दल आताच काही सांगू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR