32.4 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeधाराशिवनिवडणूक आयोगाकडून निंबाळकर, अर्चना पाटलांना नोटीस

निवडणूक आयोगाकडून निंबाळकर, अर्चना पाटलांना नोटीस

धाराशिव : महाविकास आघाडी शिवसेना उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभा रॅलीत आणि निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चात ताफावत/ खर्च कमी दाखवला असल्याने कारणे दाखवा नोटीस या दोन्ही उमेदवारांना बजावण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासात उत्तर न दिल्यास शॅडो पथकाने दाखवलेला खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाणार असल्याचे यात म्हटले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी १९ लाख ६० हजार खर्च दाखवला तर शॅडो पथकाने ३३ लाख ९२ हजार खर्च झाल्याचा अहवाल दिलाय. यासह अर्चना पाटील यांनी ४ लाख ५५ हजार खर्च दाखवला आहे तर शॅडो पथकाने हा खर्च २२ लाख ७३ हजार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR