30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाराजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित

राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित

जयपूर : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

केएल राहुल आणि दीपक हुडा यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर एलएसजीने ५ बाद १९६ धावा उभ्या केल्या. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात क्विंटन डी कॉकचा ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर संदीप शर्माने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसचा ( ०) त्रिफळा उडवून एलएसजीला ११ धावांवर दुसरा धक्का दिला. पण, कर्णधार राहुल व हुडा ही जोडी मैदानावर उभी राहिली. आर अश्विनने १३व्या षटकात आरआर ला मोठी विकेट मिळवून दिली. दीपक हुडा ३१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला आणि लोकेशसह त्याची ६२ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. लोकेशने ४८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. आयुष बदोनी ( १८), कृणाल पांड्या ( १५) व निकोलस पूरन ( ११) यांनी योगदान दिले.

यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी आरआरफ ला चांगली सुरुवात करून देताना पाच षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. यश दयालने सहाव्या षटकात एलएसलीला विकेट मिळवून दिली. बटलर १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पुढच्याच षटकात मार्कस स्टॉयनिसने एलएसजीला मोठे यश मिळवून देताना यशस्वीला ( २४) माघारी पाठवले. रियानला ( १४) अमित मिश्राने मोठा फटका मारण्यासाठी भाग पाडले आणि झेलबाद केले. ध्रुव जुरेल व संजू यांनी संयमी खेळ करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून आरआरची गाडी रुळावर आणली.

संजूने १५व्या षटकानंतर गिअर बदलला आणि रवी बिश्नोईच्या षटकात १६ धावा कुटल्या व संघाला १६ षटकांत १६० धावांपर्यंत पोहोचवले. आरआरला शेवटच्या ४ षटकांत ३७ धावा करायच्या होत्या. सॅमसनने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि जुरेलसोबत १२१ धावांची भागीदारी केली. जुरेलने ३१ चेंडूंत त्याची फिफ्टी पूर्ण केली. आरआर ने १९ षटकांत ३ बाद १९९ धावा करून ७ विकेट्सने विजय मिळवला. संजू ३३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला, तर ध्रुवनेही ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR