35 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeलातूरउदगीर तालुक्यातील साठवण  तलावावरील मोटारी जप्त

उदगीर तालुक्यातील साठवण  तलावावरील मोटारी जप्त

उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील साठवण तलावात पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे ते पाणीसाठा जपून वापर करावा, त्याचबरोबर संबधित यंञणेने तलावावरील मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन तहसीलदार  राम बोरगावकर यांनी केले.
    उदगीर तालुक्यातील  सरपंच, ग्रामसेवक,मंडळ अधिकारी, तलाठी, पाणीपुरवठा संदर्भात सूचना देण्यात  आल्या आहेत. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नागरिकांना भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी तातडीने उपायोजना कराव्यात तसेच याबाबत संबधित यंत्रणेला लेखी सूचना देण्यात याव्यात, असे सचीत करण्यात आले आहे. नागलगाव, रामतांडा, हळी हंडरगुळी, सुकणी आदी गावातील शेतक-यांच्यांच्या साठवण तलावावरील मोटारी जप्त करण्यात आल्या असून काही शेतकरी सूचना देऊनही पाणी उपसा करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत.आशा शेतक-यांच्या मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी, ज्या गावांना पाणीटंचाई भासत आहे.
अशा गावाना बोअर, विहीरी अधिगृहण करण्याची प्रक्रिया सुरु करावी, उपलब्ध आलेला पाणीसाठ्याचा योग्य वापर करावा त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई कमी प्रमाणात होईल यांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान  नूतन तहसीलदार राम बोरगांवकर यांच्याकडून तालुक्यातील प्रत्त्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून सध्याची पाणीटंचाई, भविष्यात लागणा-या उपायोजनांची माहिती घेऊन याबाबत संबंधित यंञणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR