Homeमुख्य बातम्याएअर इंडियाच्या विमानाला रन-वेवर कंटेनरची धडक

एअर इंडियाच्या विमानाला रन-वेवर कंटेनरची धडक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर ए-३५० ला रनवेवर एका बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या धडकेत विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

न्यू यॉर्कला जाणारे एअर इंडियाच्या ए-३५० विमानाने उड्डाण केले, परंतु इराणी हवाई क्षेत्र बंद असल्याने दिल्लीला परतावे लागले. दिल्लीत उतरल्यानंतर दाट धुक्यात विमान धावपट्टीवरून जात असताना, एका कंटेनरने त्याच्या उजव्या इंजिनला धडक दिली. या घटनेत विमानाच्या इंजिनचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

इराणचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाने गुरुवारी अमेरिकेला जाणारी किमान तीन उड्डाणे रद्द केली. यामध्ये दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी एक उड्डाण, दिल्लीहून नेवार्कसाठी एक उड्डाण आणि मुंबईहून न्यूयॉर्कसाठीच्या एका उड्डाणाचा समावेश आहे. या घटनेनंतर संबंधित विमान तपास व दुरुस्तीसाठी ग्राउंडेड करण्यात आले आहे. त्यामुळे काही मार्गांवरील उड्डाणांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. प्रवक्त्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR