Homeधाराशिवएकमतच्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी धाराशिवला स्नेहमेळावा

एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी धाराशिवला स्नेहमेळावा

५७ गौरवमूर्तींचा होणार कृतज्ञता सन्मान
धाराशिव : प्रतिनिधी
मराठवाड्यातील लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे दैनिक म्हणून ओळख असलेल्या एकमतच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि. २४) दुपारी १ वाजता धाराशिव येथील सांजा रोड बीएसएनएल कार्यालयाशेजारील आर्यन फंक्शन हॉल येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यात धाराशिवच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळविणा-या ५७ गौरवमूर्तीचा कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकमतचे जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम यांनी केले आहे.

एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तथा साहित्यिक पन्नालाल सुराणा, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, रुईभर येथील आंबेडकर बालविकास संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष कोळगे, धाराशिव येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक शफकत आमना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी जिल्ह्यात कृषी, उद्योग, व्यावयायिक, आरोग्य, ग्रामीण विकासासह कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक कार्य, सहकार, महिला सक्षमीकरण, प्रशासकीय कामकाज, ग्रामविकास आदी क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या मान्यवरांना कृतज्ञता सन्मानाने गौरविण्यात येते. यंदा जिल्ह्यातील ५७ सन्मानार्थीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला एकमतवर प्रेम करणा-या वाचक, हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन एकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR