एमपीएससी पेपरफुटी प्रकरण : तक्रारदार पाटील घाबरलाय, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन दिवसांआधीच फुटल्याचा खळबळजनक आरोप काही उमेदवारांनी केला आहे. तक्रारदाराने यूटर्न घेतल्यानंतर रोहित पवार यांनी त्याच्यावर दबाव असल्याचे सांगत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आहे.

औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भात बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्राच्या’ हवाल्याने सध्या व्हायरल केलं जात आहे, ते आयोगाच्या ‘सुत्रांनी’ व्यवस्थित वाचलेलं दिसत नाही किंवा ज्यांनी लिहून घेतलं त्यांचा अभ्यास फारच कच्चा दिसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी पेपर फुटलाच नाही, या दाव्याला एकप्रकारे आव्हान दिले आहे. गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी लिहिलेल्या पत्रावर रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन दिवसांआधीच फुटल्याचा खळबळजनक आरोप काही उमेदवारांनी केला आहे. १०० पैकी ९० प्रश्न आधीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे चेष्टने काहींनी पेपरफुटीचा संशय व्यक्त करून तक्रार केली होती, अशाही बातम्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. या दाव्यानंतर रोहित पवार यांनी जळजळीत पोस्ट लिहिली आहे.

तक्रारदार लोकेश पाटील घाबरलेला आहे. तक्रारदारांवर कुणाकडून तरी दबाव आणला जातोय. यासंदर्भात आम्ही तुकाराम मुंढे यांना पत्र दिले आहे. आशा आहे की ते एमपीएससीसोबत संवाद साधून पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलतील. तक्रारदारांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे तो घाबरलेला आहे, असे आरोप रोहित पवार यांनी केले आहेत.

रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढे यांची भेट
औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचीही रोहित पवार यांनी भेट घेतली. आपण पेपरफुटीच्या मुद्द्याची माहिती घेऊन एमपीएससीसोबत संवाद करावा, अशी विनंती रोहित पवार यांनी तुकाराम मुंढे यांना केली.

रोहित पवार यांचे नेमके आक्षेप काय आहेत?
आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं, याचा अर्थ स्क्रीनशॉट खरे आहेत. आयोगाकडे किंवा ‘एफडीए ’कडे चेष्टेत कुणी तक्रार करते का? तपास केल्यानंतर पेपर ‘एमपीएससी’ चा नसल्याचे निदर्शनास आले, चेष्टेत सांगितले होते तर तपास का केला? ती प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका आली होती आणि टेस्ट सिरीजचे ९० प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर आता ही टेस्ट सिरीज कोणती? २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाइप करून २० मार्च २०२६ रोजी पाठवले होते , याचा अर्थ काय? आधीचे नाव/सही आणि आताच्या पत्रातील नाव/सही वेगळी कशी?

पेपरफुटीचा मुद्दा कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, तरुणाई हुशार
दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अनेक चुका होऊन तो आणखी उघडा पडतो, असंच काहीसं औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत झालं आहे… तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच, असे रोहित पवार म्हणाले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42

Latest news