एसटीचा प्रवास पुन्हा महागणार?; प्रवाशांना झटका!

 मुंबई : प्रतिनिधी
राज्यातल्या लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने १३.५० टक्के भाडेवाढीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

यंदा १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर या वाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आज संपत असल्यामुळे आता नवीन प्रस्तावानुसार एकूण भाडेवाढ १३.५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, १० टक्के वाढ होऊ शकते.
यावेळी आणखी एक महत्त्वाचा बदल प्रस्तावित केला आहे. सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी एसटीचे तिकिट पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोघांनाही सुट्या पैशांची अडचण कमी होईल, असा महामंडळाचा दावा आहे.

महामंडळाच्या म्हणण्यानुसार, कर्मचा-यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ, डिझेलचे वाढलेले दर, टायर आणि बसच्या सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ यामुळेच वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आर्थिक खर्च भरून काढण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे मत आहे.

पण फक्त भाडेवाढ करूनही महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. मे महिन्यात एसटीचे वाहतूक उत्पन्न १,०४७.१७ कोटी रुपये होते, तर खर्च १,०९६.०७ कोटी रुपये झाला. राज्यातल्या ३१ पैकी २२ विभागांना स्वत:चा खर्चही भागवता आलेला नाही. याआधी जानेवारी २०२५ मध्ये १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. आता प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नवीन दर तातडीने लागू होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25

Latest news