ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा केवळ सामाजिक नव्हे तर घटनात्मक हक्कांचा प्रश्न आहे. आरक्षणाचे संरक्षण आणि समाजाच्या वास्तविक लोकसंख्येची नोंद होण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरल्यामुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली. मात्र, प्रस्तावित जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्याने समाजाच्या हक्कांवर गदा येण्याची भीती आहे. यासंदर्भात लवकरच ओबीसी संघटनांची बैठक आयोजित केली जाणार असून राज्यभर जनजागृती आणि आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पावसाची अनिश्चितता आणि एल-निनोच्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, धरणांमधील घटता पाणीसाठा, मराठवाड्यासह अनेक भागांतील गंभीर परिस्थिती आणि शेतक-यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर राज्यासमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. त्यामुळे सरकारने वेळ न दवडता ठोस नियोजन आणि कृति आराखडा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू
देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी सत्ताधा-यांवर गंभीर आरोप केले. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी लोकशाही संस्थांवर दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला. देशात विरोधी पक्ष संपवण्याचे आणि एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर जनतेने याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पक्षाची पुनर्बांधणी करतील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अलीकडच्या राजकीय घडामोडींविषयी विचारले असता वडेट्टीवार यांनी संतुलित प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतरे आणि येण्या-जाण्याच्या घटना नवीन नाहीत. कोणताही पक्ष किंवा विचार इतक्या सहजपणे संपवता येत नाही. उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कायदा-सुव्यवस्थेवरही सरकारला घेरणार
राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. नागपूरसह अनेक शहरांमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत त्यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला या मुद्यांवर जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी
ओबीसी जनगणना, संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि लोकशाही संस्थांवरील दबाव या मुद्यांवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून मिळाले. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news