होर्मुझमधील वाहतूक इराणने पुन्हा रोखली

अमेरिकेसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग दाटले

तेहरान : वृत्तसंस्था
इराणच्या सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा सैन्याच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दक्षिण लेबनॉनमधून सैन्य न हटवल्याने आणि इस्रायलने सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने होर्मुझमधून होणारी वाहतूक रोखण्याची घोषणा इराणने केली आहे. शस्त्रसंधीचे सातत्याने होत असलेले उल्लंघन म्हणजे विश्वासघात असल्याचे इराणने म्हटले.

होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद करणे हे पहिले पाऊल आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच राहिल्यास आणखी कठोर पावले उचलण्यात येतील, असा इशारा इराणकडून देण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणनं याच आठवड्यात सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. त्यानंतरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा करण्यात आली. पण आता इराणने होर्मुझमधील वाहतूक पुन्हा बंद केली आहे. राणने होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद करत जगाच्या गळ्याची नस पुन्हा दाबली आहे. या मार्गानं जगातील २० टक्के तेल व्यापार चालतो. त्यामुळे हा मार्ग जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. इराणने हा मार्ग पुन्हा बंद केल्याने खनिज तेलाचे दर पुन्हा वाढतील. त्यामुळे इंधनाचे दर वाढून महागाईचा भडका उडेल.

इस्रायलने हल्ले सुरू
ठेवल्याने नवे संकट
अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार होताच पुढच्या काही तासांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याने हल्ले चढवले. यात ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरुच ठेवल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील सामंजस्य करार संकटात सापडला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news