कर्नाटक राज्यातील एका गुन्ह्यासह १५ गुन्हे उघडकीस

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पथकाने दि. १ ऑगस्ट रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे.
पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुस-या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news