कल्याणमध्ये पुन्हा पेटला मराठी-अमराठी वाद

मुंबई : प्रतिनिधी
खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणा-या मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे, कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका क्लिनिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका परप्रांतीय तरुणाने रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणा-या तरुणीला आतमध्ये घुसून लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यामध्ये त्या मारहाणीची भीषणता दिसून येते.

डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा, इतकंच ही तरुणी बोलली होती, मात्र ते ऐकल्यांतर तो तरुण तिरीमिरीने आता शिरला आणि काहीही विचार न करता त्याने त्या तरुणीला मारायला सुरुवात केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामुळे राज्यात कित्येक दिवसांपासून सुरू असलेला मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून वाद आणखी चिघळू शकतो.

कल्याणच्या नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. तेथे डॉक्टरांना भेटण्यासाठी गोपाळ झा नावाचा परप्रांतीय इसम आला होता. मात्र डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच कोणीतरी बसले होते, त्यामुळे त्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीने समोर आलेल्या त्या इसमाला थोडे थांबण्यास सांगितले.

पण ते ऐकल्यावर गोपाळ झा याने त्या रिसेप्शनिस्ट तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर ती तरुणी त्याच्याशी बोलत असताना हा इसम तावातावाने पुढे आला आणि त्या तरुणीच्या अंगावर धावून गेला. आधी त्याने तिला लाथ मारली, त्यामुळे ती तरुणी खाली पडली. नंतर त्याने तिच्या केसांना धरून तिला फरफटत ओढले आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाणही केली.
ते पाहून क्लिनिकमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्या इसमाला रोखण्याचा आणि त्या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या संपूर्ण घटनेत त्या तरुणीला बराच मार लागला असून ती चांगलीच जखमी देखील झाली आहे. ही दुर्दैवी घटना तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर फरार झालेला आरोपी गोपाळ याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news