कारेवाडी संघ विजेता, साकोळ संघ उपविजेता

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोळ येथे क्रिडापट्टू गणेश रामशेटे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस खेळाडू व क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत परिसरातील तब्बल २० संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे व रोमांचक झाले. अंतिम सामन्यात सुरजदादा क्रिकेट क्लब कारेवाडी संघाने दमदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावले, तर यजमान इंडियन आर्मी क्रिकेट क्लब साकोळ संघाने उपविजेतेपद मिळविले.
दोन्ही संघांमधील अंतिम सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. कारेवाडी संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सरस कामगिरी करीत १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ करणा-या खेळाडूंना  विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या  संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक  व रोख बक्षिसे प्रदान करण्यात  आली. स्पर्धेला परिसरातील नागरिक, युवक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. क्रिडापट्टू व क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणी ठरलेल्या सात दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संकेत जाधव, करण शिंदे, अंबादास मादळे, विक्रांत शिंदे, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व खेळाडूंनी परिश्रम  घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news