गरोदर महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉल या औषधाबद्दल एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. ट्रम्प यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने जन्माला येणा-या बाळाला ऑटिझमचा धोका वाढतो. त्यांनी यासंदर्भात गरोदर महिलांसाठी इशारा देखील दिला आहे.
व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, मला वाटते की आपल्याला ऑटिझमचे उत्तर मिळाले आहे. गर्भधारणेच्या काळात महिलांकडून एसिटामिनोफेन औषधाचा वापर केल्याने बाळांमध्ये ऑटिझमचा धोका वाढतो. पॅरासिटामॉल हे अमेरिकेत एसिटामिनोफेन या नावाने ओळखले जाते, जे टायलेनॉल सारख्या ब्रँड नावाने विकले जाते. ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना पॅरासिटामॉलचा वापर केवळ अत्यंत आवश्यक असेल तरच करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या निर्णयामागे त्यांचे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर असल्याचे म्हटले जाते, जे पर्यावरणीय घटक आणि औषधांचा संबंध ऑटिझमशी तपासण्यासाठी ओळखले जातात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉलच्या लेबलवर या धोक्याचा इशारा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतात पॅरासिटामोल हे गर्भधारणेदरम्यान सर्वात सुरक्षित औषध मानले जाते. त्यामुळे, या दाव्यामुळे भारतातही चिंता वाढली आहे.
मात्र, अनेक आरोग्य तज्ञांनी ट्रम्प यांच्या या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. त्यांचे असे मत आहे की, ऑटिझमच्या वाढत्या प्रमाणामागे कोणते पर्यावरणीय घटक आहेत हे सिद्ध करण्यासाठी अजून सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांनी यापूर्वी लसींमुळे ऑटिझम होतो असा दावा केला होता, जो अनेक वैज्ञानिक अभ्यासातून खोटा ठरला आहे.
बालरोग तज्ज्ञ काय म्हणतात…
पॅरासिटामॉल हे एक सुरक्षित औषध आहे आणि त्याच्या वापराबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही, असे बालरोगतज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.  वैद्यकीय सल्ल्यासाठी ‘गुगल’ चा वापर न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news