लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावणारी तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ‘मी होणार सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोची विजेती सायली टाक हिने दयानंद कला महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. सायली टाक हिचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते तिच्या पालकांच्या उपस्थितीत औपचारिक स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाने तिच्या कलाविकासासाठी आवश्यक सर्व शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत तिचे पालकत्व स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. यावेळी उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, संगीत विभाग प्रमुख व आयक्यूएसी प्रमुख डॉ. संतोष पाटील, डॉ. सुनील साळुंके, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. सुवर्णा लवंद, डॉ. दुर्गा शर्मा, संजय व्यास तसेच सुनील टाक यांची प्रमुख उपस्थिती होती.
















