Homeलातूरगावागावांत फक्त निवडणुकीचीच चर्चा

गावागावांत फक्त निवडणुकीचीच चर्चा

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता कळसावर पोहोचली आहे. आज दोन गण व चार गणांचा निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, गावागावांत एकच चर्चा रंगली आहे—कोण बाजी मारणार?

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी निकालाबाबतची धाकधूक आणि अपेक्षा स्पष्टपणे जाणवत आहेत.चौकाचौकात,चहाच्या टपरीवर, शेतशिवारात तसेच घराघरांत मतदार मतदानाची टक्केवारी, उमेदवारांचा जनसंपर्क, शेवटच्या टप्प्यातील प्रचार आणि आघाड्यांच्या हालचाली यावरून निकालाचे अंदाज बांधत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते आजच्या निकालाकडे डोळे लावून बसले असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही ठिकाणी विजयाचे दावे केले जात असले तरी अनुभवी मंडळी ‘मतपेटी उघडल्यानंतरच खरी स्थिती समजेल’ अशी सावध प्रतिक्रयिा देत आहेत.

दरम्यान प्रशासनाने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून तहसील कार्यालयाच्या सभागृहात ८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर पारदर्शक आणि शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. आज जाहीर होणा-या निकालातून कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळतो, कोणते उमेदवार विजयी ठरतात आणि स्थानिक सत्तासमीकरण कसे बदलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निकालावरच पुढील स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR