गुन्हा दाखल होईपर्यंत जागेवरून उठणार नाही

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासोबत जंतरमंतरवरील आंदोलनात पॅलेट गनने जखमी झालेला साहिल नामक विद्यार्थीही होता. राहुल यांनी पॅलेट गनच्या वापराबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु एफआयआर दाखल न झाल्यामुळे ते पोलिस ठाण्याबाहेरच धरणे आंदोलनाला बसले. प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत धरण्यावर बसल्या आहेत.

काँग्रेस नेत्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी नारेबाजी सुरू केली असून यामुळे संसद मार्ग पोलिस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सलाही तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राहुल यांनी यापूर्वी पावसाळी अधिवेशनात संसदेवरील मोर्चात पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्पष्टीकरणाचीही मागणी केली होती. मात्र, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोलिसांकडून गोळीबार झाला नसल्याचा दावा केला होता.

नीट पेपरफुटी व परीक्षांमधील अनियमितता या मुद्द्यांवरून कॉकरोच जनता पार्टीने २० जून रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. या काळात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण केले. २० जुलै रोजी झालेल्या संसद चलो (संसदेकडे कूच) आंदोलनात पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर २५ जुलै रोजी हे आंदोलन समाप्त झाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणातून संपूर्ण कुटुंब शहाणे करणारे अवलिया - एच.एन सय्यद
04:11
Video thumbnail
NILANGA|माळरानावर ड्रॅगन फूडची बाग;रमेश सातपुतेंची यशोगाथा
01:50
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शून्यातून विश्व निर्माण करणारे बी.आर शिंदे
04:09
Video thumbnail
NILANGA|बांधकाम व्यवसायात गरुड झेप;बिल्डर प्रकाश बोडगे
02:05
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|जिद्द मेहनतीच्या बळावर घडलेला उद्योजक प्रशांत यरमलवार
04:49
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणाची साथ,शेतीची वाट-पटेल बंधूंचा आदर्श
05:35
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकीचा वारसा जपणारे गुरुनाथ शिंदाळकर
10:30
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकी जपणाऱ्या डॉ.पूजा बिडवे -बेद्रे
04:15
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL| महिला सक्षमीकरणाच्या यशोगाथा घडविणाऱ्या अनुसया शिरूरे
04:59
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|कामातून घडलेले नगरसेवक सुधीर लखनगावे
02:06
Video thumbnail
RENAPUR|प्राचार्य अनिल कुटवाड यांची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी
03:37
Video thumbnail
RENAPUR|माळरानावर हिरवे स्वप्न फुलवणारे साहित्यिक पांडुरंग कांबळे
03:24
Video thumbnail
LATUR| किलेशन थेरपीतून विविध आजारांवर उपचार- डॉ संतोष बुरले
04:19
Video thumbnail
LATUR| महापुर ग्रामपंचातीचा ग्रामविकासात ठसा
02:22
Video thumbnail
LATUR| एक कुशल प्रशासक शिक्षणाधिकारी प्रमोद पवार
06:35

Latest news