३६ देशांतील बँकांमध्ये असलेल्या पैसा कुणी दिला?; नाना पटोले यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रश्न

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर आणि निधीवर बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, आज जागतिक पातळीवर आरएसएसच्या बाबत एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जगभरातील तब्बल ३६ देशांमध्ये या संघटनेचे बँक खाते आहे. या खात्यांमध्ये अमाप पैसा जमा आहे. मात्र, हा पैसा नेमका कुठून येतो? तो कुणी दिलेला आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पैशांचे कोणतेही ऑडिट (लेखापरीक्षण) का होत नाही? असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले.

पुढे बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे, असा धक्कादायक दावा पटोले यांनी केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरूनही पटोले यांनी संघाला लक्ष्य केले. ते म्हणाले, राम मंदिर हे संपूर्ण देशाचे आणि सर्वांचेच श्रद्धेचे स्थान आहे. मात्र, या मंदिराच्या उभारणीत आणि निधीतही लूट करण्यात, त्यावर डाका टाकण्यात आरएसएसचा सहभाग आहे, आणि ही बाब आता कोणापासूनही लपलेली नाही.

अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष
अमेरिकेने संघाला दहशतवादी संघटना ठरवल्याच्या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करत पटोले यांनी स्पष्ट केले की, जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या या स्थितीमुळे अमेरिका आता या संघटनेबाबत नेमकी काय भूमिका (स्टँड) घेते, याकडे आमचे आणि सर्वांचेच बारकाईने लक्ष लागून आहे. पटोले यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
AHAMADPUR|रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉ.अंजली उगीले
06:05
Video thumbnail
AHAMADPUR|दर्जेदार कामाचा ब्रँड निर्माण करणारे अभियंता अनिल डाके
04:07
Video thumbnail
CHAKUR|नरदीय कीर्तन परंपरा जपणारे रामदास शास्त्री महाराज
03:44
Video thumbnail
AHAMADPUR|लोकाभिमुख कार्य करणारे अविनाश पवार
02:54
Video thumbnail
CHAKUR|तांत्रिक क्षेत्रांचे अग्रदूत सुगावचे श्रीकृष्ण शिंदे
04:22
Video thumbnail
AHAMADPUR|यांत्रिकी पद्धतीने आर्थिक उन्नती साधणारे प्रगतशील शेतकरी राजेश उगीले
03:05
Video thumbnail
NILANGA|ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ देणारे क्रीडागुरु प्रा.डॉ.गोपाळ मोघे
02:17
Video thumbnail
NILANGA|आदर्श ग्रामविकासाचा नवा चेहरा-युवा सरपंच नागनाथ अंबिलपुरे
03:17
Video thumbnail
NILANGA|पतीच्या निधनानंतर संसार सांभाळत शोभाताईंची पापड उद्योगात भरारी
03:48
Video thumbnail
NILANGA|जनतेचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी
04:39
Video thumbnail
NILANGA|हजारो चिमुकल्याचे देवदूत डॉ.प्रल्हाद साळुंके
02:23
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणातून संपूर्ण कुटुंब शहाणे करणारे अवलिया - एच.एन सय्यद
04:11
Video thumbnail
NILANGA|माळरानावर ड्रॅगन फूडची बाग;रमेश सातपुतेंची यशोगाथा
01:50
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शून्यातून विश्व निर्माण करणारे बी.आर शिंदे
04:09
Video thumbnail
NILANGA|बांधकाम व्यवसायात गरुड झेप;बिल्डर प्रकाश बोडगे
02:05

Latest news