एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. आत्महत्या करणा-या मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलांचा तोल गेल्याने डोंगरावरून पडून मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीला डोंगरावरून पडताना बघून आईनेही उडी मारली. या घटनेने संभाजीनगरात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी सकाळी एक तरुण आत्महत्या करण्यासाठी वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला होता. त्याची समजूत काढण्यासाठी आई-वडीलही तिथे पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. पोलिस कर्मचारी आणि आई-वडील त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. डोंगराच्या कडेला तो मुलगा थांबल्याने समजूत काढण्यापलीकडे इतर पर्याय नव्हता.

काही वेळाने त्या तरुणाने डोंगरावरून उडी मारली. यादरम्यान त्याला वाचवायला गेलेल्या वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही डोंगरावरून खाली पडले. मुलगा आणि पती डोंगरावरून पडल्याचे बघून आईनेही डोंगरावरून उडी मारली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे (मुलगा, १८ वर्षे), मुरलीधर चांदवडे (वडील), संगीता चांदवडे (आई) अशी या मृतांची नावे असून प्राथमिक अंदाजानुसार कुणाल हा नैराश्यात होता, असे समजते. घरगुती कारणावरूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणातून संपूर्ण कुटुंब शहाणे करणारे अवलिया - एच.एन सय्यद
04:11
Video thumbnail
NILANGA|माळरानावर ड्रॅगन फूडची बाग;रमेश सातपुतेंची यशोगाथा
01:50
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शून्यातून विश्व निर्माण करणारे बी.आर शिंदे
04:09
Video thumbnail
NILANGA|बांधकाम व्यवसायात गरुड झेप;बिल्डर प्रकाश बोडगे
02:05
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|जिद्द मेहनतीच्या बळावर घडलेला उद्योजक प्रशांत यरमलवार
04:49
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणाची साथ,शेतीची वाट-पटेल बंधूंचा आदर्श
05:35
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकीचा वारसा जपणारे गुरुनाथ शिंदाळकर
10:30
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकी जपणाऱ्या डॉ.पूजा बिडवे -बेद्रे
04:15
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL| महिला सक्षमीकरणाच्या यशोगाथा घडविणाऱ्या अनुसया शिरूरे
04:59
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|कामातून घडलेले नगरसेवक सुधीर लखनगावे
02:06
Video thumbnail
RENAPUR|प्राचार्य अनिल कुटवाड यांची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी
03:37
Video thumbnail
RENAPUR|माळरानावर हिरवे स्वप्न फुलवणारे साहित्यिक पांडुरंग कांबळे
03:24
Video thumbnail
LATUR| किलेशन थेरपीतून विविध आजारांवर उपचार- डॉ संतोष बुरले
04:19
Video thumbnail
LATUR| महापुर ग्रामपंचातीचा ग्रामविकासात ठसा
02:22
Video thumbnail
LATUR| एक कुशल प्रशासक शिक्षणाधिकारी प्रमोद पवार
06:35

Latest news