नाशिकचे नवे पालकमंत्री मुख्यमंत्री असल्यासारखे वागताहेत; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

नाशिक : प्रतिनिधी
आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नवे पालकमंत्री जे नेमले आहेत, ते आता स्वत:ला नाशिकचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी काही मोठे बंगले वगैरे घेतल्याचीही चर्चा आहे, असा टोला अप्रत्यक्षपणे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.

कुंभमेळ्याच्या तयारीवर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चव्हाण म्हणाले की, गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी अंदाजे ३ हजार ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता. त्यावेळी सुमारे ४० लाख भाविक आले होते. आता सरकारने थेट ३५ हजार कोटींचे बजेट काढले आहे आणि ६ कोटी लोक येतील असा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात किती लोक येणार, याचा सरकारने काही अभ्यास केला आहे का? याचा कोणताही ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करण्यात आलेला नाही.

समृद्धी महामार्गाचा दाखला देत चव्हाणांनी थेट सरकारच्या हेतूवरच शंका घेतली. ‘कुंभमेळा हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे, मोठ्या संख्येने लोक येतात आणि आवश्यक तो खर्च व्हायलाच हवा. पण सध्याचा विषय फक्त पैसे खाण्याचा आणि टेंडर काढण्याचा आहे. कुठली मोठी कॉन्ट्रॅक्ट्स कोणाला दिली? सब-कॉन्ट्रॅक्ट्स कुणाला दिली? हे सर्व संशयास्पद आहे. समृद्धी महामार्गही लोकांच्या भल्यासाठी होता की फक्त कंत्राटदारांसाठी? असा प्रश्न पडतो,’ असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस कमिटी करणार खर्चाचे विश्लेषण
३५ हजार कोटींचे हे बजेट अतिशय शॉकिंग आहे. तुम्ही नाशिककरांना विचारले आहे का की त्यांना नेमके काय पाहिजे? यावर पब्लिक रिपोर्ट घेऊन उघड चर्चा झाली पाहिजे. मी काँग्रेस कमिटीला या संपूर्ण प्रकरणाचे अ‍ॅनालिसिस (विश्लेषण) करायला सांगणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

पक्षफोडीवरूनही सरकारवर निशाणा
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील पक्षफोडीच्या राजकारणावरूनही सत्ताधा-यांना धारेवर धरले. विरोधी पक्षांचे संख्याबळ आधीच कमी आहे, त्यातही सत्ताधा-यांकडून सातत्याने फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
AHAMADPUR|रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉ.अंजली उगीले
06:05
Video thumbnail
AHAMADPUR|दर्जेदार कामाचा ब्रँड निर्माण करणारे अभियंता अनिल डाके
04:07
Video thumbnail
CHAKUR|नरदीय कीर्तन परंपरा जपणारे रामदास शास्त्री महाराज
03:44
Video thumbnail
AHAMADPUR|लोकाभिमुख कार्य करणारे अविनाश पवार
02:54
Video thumbnail
CHAKUR|तांत्रिक क्षेत्रांचे अग्रदूत सुगावचे श्रीकृष्ण शिंदे
04:22
Video thumbnail
AHAMADPUR|यांत्रिकी पद्धतीने आर्थिक उन्नती साधणारे प्रगतशील शेतकरी राजेश उगीले
03:05
Video thumbnail
NILANGA|ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ देणारे क्रीडागुरु प्रा.डॉ.गोपाळ मोघे
02:17
Video thumbnail
NILANGA|आदर्श ग्रामविकासाचा नवा चेहरा-युवा सरपंच नागनाथ अंबिलपुरे
03:17
Video thumbnail
NILANGA|पतीच्या निधनानंतर संसार सांभाळत शोभाताईंची पापड उद्योगात भरारी
03:48
Video thumbnail
NILANGA|जनतेचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी
04:39
Video thumbnail
NILANGA|हजारो चिमुकल्याचे देवदूत डॉ.प्रल्हाद साळुंके
02:23
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणातून संपूर्ण कुटुंब शहाणे करणारे अवलिया - एच.एन सय्यद
04:11
Video thumbnail
NILANGA|माळरानावर ड्रॅगन फूडची बाग;रमेश सातपुतेंची यशोगाथा
01:50
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शून्यातून विश्व निर्माण करणारे बी.आर शिंदे
04:09
Video thumbnail
NILANGA|बांधकाम व्यवसायात गरुड झेप;बिल्डर प्रकाश बोडगे
02:05

Latest news