29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeनांदेडट्रकने दहा दुचाकी चिरडल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर

ट्रकने दहा दुचाकी चिरडल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर

भोकर : बससाठी मार्ग मोकळा करण्यासाठी वळण घेणा-या ट्रकने बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या १० दुचाकींना चिरडले. यात एका पादचा-याचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. ही घटना बारड येथे मंगळवारी सकाळी घडली.

भोकरपासून २५ किमी अंतरावर नांदेड माहामार्गावर मंगळवारी ३० रोजी सकाळी सिमेंट वाहतुक करणारा ट्रक क्र एमएच ३४ बीजी ७४२३ हा नांदेडकडे येत होता. बारड येथे सकाळी आठच्या सुमारास बसस्थानकातून येणा-या बसला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी ट्रकने डावीकडे वळल घेतले. यावेळी चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून थेट बसस्थानकासमोरील रस्त्यालगत उभ्या अंदाजे १० दुचाकींना उडविले. यामध्ये ५ दुचाकींचा चुराडा झाला आणि ट्रक नालीच्याकडेला अडकून बसला. या घटनेमध्ये मौजे खरबी येथील माजी उपसरपंच गोविंदराव रामजी कोडेवाड वय ५५ यांचा मृत्यु झाला. सुनिल राठोड यांच्या डोक्याला, पायाला हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर इतर ८ जण जखमी असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच बारड ठाण्याचे सपोनि केदारे यांच्यासह कर्मचारी आणि महामार्ग मदत केंद्रातील पोलीस उपनिरिक्षक हनुमंत कवळे, राजेश लयगुलवार, पोलीस अंमलदार अब्दुल गणी, शेख ऊजेर, गणपत शेवाळकर, सुधाकर रणविरकर, संतोष निलेवार, संतोष वागतकर, अमोल सातारे, गुरूप्रितसिंघ मान, बालाजी ठाकूर, नितीन भुताळे, परमेश्र्वर श्रीमंगले, बालाजी हिंगनकर आणि ज्ञानेश्र्वर आवातिरक हे घटनास्थळी पोहचून रस्त्यावर पडलेली वाहने बाजूला करुन तात्काळ जखमींना रुग्णालयांत पोहचविण्याचे काम केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR