डुकराच्या प्रत्यारोपित हृदयाने दिले जीवदान!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाच्या जगात एक कमाल करून दाखवली आहे. मेरीलँड शहरातील ५८ वर्षांच्या एका व्यक्तीला, जो मृत्यूच्या जवळ होता, त्याला डुकराचे हृदय प्रत्यारोपित (ट्रान्सप्लांट) करून नवीन जीवन दिले. हा रुग्ण मानवी हृदय प्रत्यारोपणासाठी शारिरीक दृष्ट्या अनुकूल नव्हता; पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.

ज्या वैद्यकीय टीमने ही शस्त्रक्रिया केली, त्यांनी गेल्या वर्षीही असेच एक ऑपरेशन केले होते. या रुग्णाने पूर्वी नौदलात सेवा केली होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याला नवीन जीवन मिळाले आणि तो आता पूर्णपणे ठीक आहे. प्राण्यांचे अवयव मानवांमध्ये बसवण्याच्या प्रक्रियेला ‘झेनो-ट्रान्सप्लांटेशन’ म्हणतात. सध्या अमेरिकेत १ लाखाहून अधिक लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत, डॉक्टर जनुकीय बदल केलेल्या डुकरांच्या अवयवांचा वापर करून रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करत आहेत.

यापूर्वी गेल्या वर्षीही एका रुग्णाला डुकराचे हृदय बसवण्यात आले होते; परंतु ऑपरेशननंतर दोन महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी, लॉरेन्स फॉसेट यांना नवीन हृदय मिळाले. डॉक्टरांनी सांगितले की, फॉसेटचे नवीन हृदय पूर्णपणे काम करत आहे आणि त्यांना कोणत्याही मशिनच्या मदतीची गरज नाही. हा उपचार विज्ञान जगतातील एक मोठे यश मानले जात आहे.

डुकरांवरील संशोधनामुळे आशा
वैज्ञानिकांनी अवयव दानासाठी डुकरांना एक आदर्श प्राणी मानले आहे. त्यांच्या अवयवांचा आकार, त्यांची वाढ जलद होणे आणि त्यांची रचना मानवांसाठी योग्य आहे. भविष्यात डुकरांच्या अवयवांमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचवता येतील. विज्ञान आणि मानवतेसाठी ही एक मोठी उपलब्धी ठरत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news