डॉक्टरविना चीनमध्ये ६० सेकंदात तपासणी, औषधही हजर!

बीजिंग : वृत्तसंस्था
चीनने तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाला पुन्हा एकदा थक्क केले. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका अशा रुग्णालयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एकही डॉक्टर प्रत्यक्ष हजर नसताना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे एआय संचालित क्लिनिक (एआय क्लिनिक) पाहून नेटिझन्स म्हणत आहेत की, ‘चीन सध्या ३०२६ सालात जगत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील हे रुग्णालय म्हणजे एक छोटे कियोस्क किंवा केबिन आहे. यामध्ये रुग्णाने प्रवेश केल्यावर त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे पार पडते.

संवाद : रुग्ण आत गेल्यावर एआय सिस्टीमशी संवाद साधतो. एआय एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणे रुग्णाला लक्षणे, जुनी आजारपण आणि इतर माहिती विचारते.

६० सेकंदांत निदान : सर्व माहिती मिळाल्यावर अवघ्या १ मिनिटाच्या आत (६० सेकंद) एआय सिस्टीम आजाराचे अचूक आकलन करते.

तज्ज्ञांची पडताळणी : एआयने गोळा केलेला डेटा एका रिमोट (दुस-या ठिकाणी बसलेल्या) मानवी डॉक्टरांकडे पाठवला जातो. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच पुढील प्रक्रिया सुरू होते.

झटपट औषधे : निदानानंतर रुग्णाला बाहेर जाण्याची गरज पडत नाही; त्याच मशिनमधून आवश्यक औषधे त्वरित बाहेर येतात.

सोशल मीडियावर या तंत्रज्ञानाचा व्हिडीओ पाहून जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतातही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज आहे का, यावर चर्चा रंगली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, गंभीर आजारांसाठी मानवी डॉक्टरांची गरज असली तरी, सर्दी, ताप आणि प्राथमिक उपचारांसाठी हे एआय क्लिनिक अत्यंत प्रभावी ठरू शकते.

१००० हून अधिक केंद्रे उभारणार
चीन सरकार अशा प्रकारचे १००० एआय कियोस्क देशभर बसविण्याच्या तयारीत आहे. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी कमी होण्यास आणि ग्रामीण भागात त्वरित आरोग्य सेवा पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्यापेक्षा अवघ्या काही मिनिटांत उपचार मिळवण्याचा हा मार्ग आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news