तटकरे, भुजबळांध्ये बैठकीत खडाजंगी

पटेल गैरहजर, राष्ट्रवादीतील धुसफूस उघड
मुंबई : प्रतिनिधी
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची पक्षातील नाराजी वाढत चालली आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या माय-लेकांनी घेतलेल्या काही निर्णयांनी पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती पुढे येत असताना आज राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले. यावेळी तटकरे यांनी आमच्यावर टीका होत असताना पक्षातील कोणतेही नेते आमच्या मदतीला आले नाहीत, अशा शब्दांत मनातील खदखद बोलून दाखविली. त्यावेळी तटकरे, भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी, माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आज आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिले. यावेळी तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत व्यक्त केली.

प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. पण ते गैरहजर राहिले. त्यातच ज्येष्ठ नेत्यांना डावलेले जात असल्याची पक्षातील दुस-या फळीतील नेत्यांची भावना आहे. या घडामोडीमुळे शरद पवार यांना भेटण्यासाठी काही आमदार आणि तटकरे गेल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे.

आम्ही दोघेच टीकेचे धनी का?
दादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का, असा सवाल तटकरे यांनी केला. या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झाले ते झाले, ते सोडून द्या, आता पुढे जाऊया, असा सल्ला दिला. त्यावरून दोघांत खडाजंगी झाल्याचे समजते. याचवेळी तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याचे समजते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42
Video thumbnail
Nanded|नांदेड विभागात एसटीचा महिन्याला 50 लाखांचा वाढीव भार;तोट्यातील एसटीवर इंधन दरवाढीचे संकट
02:57
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने आठवणीना उजाळा
19:36
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
00:00
Video thumbnail
माहूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठाचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
01:38
Video thumbnail
जळकोट: उमरगा रेतू पाटीवर पुन्हा भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीची धडक, दोघे गंभीर जखमी
01:54
Video thumbnail
बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण'; हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार
00:42
Video thumbnail
राष्ट्रपती भवनात रघुवीर खेडकरांचा 'पद्मश्री'ने सन्मान; तमाशा सृष्टीला पहिल्यांदाच राष्ट्रीय बहुमान
00:37
Video thumbnail
'विठ्ठलाचा पांडुरंग' आत्मचरित्राचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते थाटात प्रकाशन
19:11
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42

Latest news