विधानपरिषद निवडणूक, महायुतीत पेच कायम

आज दिल्लीत बैठक, पत्रकारांच्या प्रश्नावर शिंदे भडकले
मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सोडण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्धा तास बैठक होऊनही मार्ग निघाला नाही. भाजपने खूपच ताणून धरल्याने शिंदे अस्वस्थ झाले असून पत्रकारांनी विधानपरिषदेबाबत विचारता ते चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दरम्यान यासंबंधी तोडगा काढण्यासाठी उद्या बुधवारी राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर पाठवण्यात येणा-या १७ जागांची निवडणूक होत आहे. या १७ पैकी १४ जागांवर भाजपने दावा सांगितला असून शिवसेनेला दोन व राष्ट्रवादीला एक जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे शिंदे वैतागले आहेत. त्यांनी पाच जागांसाठी आग्रह धरला आहे. शिंदेंची शिवसेना ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, हिंगोली-परभणी या जागांसाठी आग्रही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगडच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनेकदा बैठका होऊनही महायुतीच्या जागांचा तिढा कायम होता. आजही यावर कोणताही तोडगा निघाला नाही. कांद्याच्या प्रश्नासाठी उद्या दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे.

भाजपच्या यादीवर
दिल्लीत होणार चर्चा
विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना झाले. विधान परिषदेच्या एकूण १२ जागांसाठी ४८ जणांच्या नावांची यादी तयार केली आहे. दिल्ली दौ-यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन रविंद्र चव्हाण चर्चा करणार आहेत. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42
Video thumbnail
Nanded|नांदेड विभागात एसटीचा महिन्याला 50 लाखांचा वाढीव भार;तोट्यातील एसटीवर इंधन दरवाढीचे संकट
02:57
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने आठवणीना उजाळा
19:36
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
00:00
Video thumbnail
माहूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठाचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
01:38
Video thumbnail
जळकोट: उमरगा रेतू पाटीवर पुन्हा भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीची धडक, दोघे गंभीर जखमी
01:54
Video thumbnail
बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण'; हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार
00:42
Video thumbnail
राष्ट्रपती भवनात रघुवीर खेडकरांचा 'पद्मश्री'ने सन्मान; तमाशा सृष्टीला पहिल्यांदाच राष्ट्रीय बहुमान
00:37
Video thumbnail
'विठ्ठलाचा पांडुरंग' आत्मचरित्राचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते थाटात प्रकाशन
19:11
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42

Latest news