लाडकी बहीण योजनेत तब्बल ३५०० कोटींचा जादा खर्च; ‘कॅग’च्या खुलाशाने सरकार अडचणीत?

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी केलेल्या निरीक्षणांमुळे राज्य सरकारसमोर अनेक आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेवर मंजूर तरतुदीपेक्षा तब्बल ३,५४१.१६ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या वाढीव खर्चामागील कारणांबाबत संबंधित विभागाकडून समाधानकारक माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची नोंदही करण्यात आली आहे.

अहवालानुसार, महिला व बालविकास विभागासाठी सुरुवातीला २६,२००कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर ‘लेक लाडकी’ योजनेतील ३,४९०.७५ कोटी रुपये या योजनेकडे वळवण्यात आले. त्यामुळे उपलब्ध निधीची रक्कम २९,६९३.०९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, प्रत्यक्ष खर्च ३३,२३७.२४ कोटी रुपये इतका झाल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे समोर आले आहे.

कॅगने सांगितले आहे की, अशा मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी निधीचे नियोजन करताना लाभार्थ्यांची संख्या, निधीची आवश्यकता आणि संभाव्य खर्च यांचे अधिक अचूक मूल्यमापन होणे आवश्यक आहे. अन्यथा वारंवार अतिरिक्त निधीची गरज निर्माण होऊन आर्थिक व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो.

अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत सुमारे १५,५८६ कोटी रुपये काढून ते व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटस्मध्ये ठेवण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तातडीची आवश्यकता नसताना निधी अशा खात्यांमध्ये ठेवणे हे अर्थसंकल्पीय शिस्तीच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचे कॅगने म्हटले आहे.

महिला कल्याणासाठीचा खर्च २०२३-२४ मधील २६१. ७८ कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये ३३,५५४.३६ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा खर्च महिलांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी उपयुक्त ठरला असला, तरी गृहनिर्माण आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांवरील खर्चात घट झाल्याने भविष्यातील विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता कॅगने व्यक्त केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36
Video thumbnail
पुण्यात माऊलींच्या पालखीचे अलोट उत्साहात स्वागत; दगडूशेठ गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी!
01:05

Latest news