दिशा पतसंस्थेच्या नळदुर्ग शाखेतून पावणेपाच किलो सोने लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून २ कोटी ६१ लाख ४२ हजार २७ रूपये किंमतीचे ४ किलो ७६२ वजनाचे सोन्याचे दागिने व रोख २ लाख २१ हजार २४५ रूपये चोरट्यांनी लंपास केले. ही चोरीची घटना दि. ८ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दिशा पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दिशा नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा कार्यरत आहे. या शाखेतून आरोपी राहुल राजेंद्र जाधव, रा. नळदुर्ग, सुशिल राठोड रा. नळदुर्ग व अन्य चार व्यक्तींनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री दिशा पतसंस्थेच्या नळदुर्ग शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तिजोरीतील ४ किलो ७६२ ग्रॅम, ६७९ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे २ कोटी ६१ लाख ४२ हजार २७ रूपये किंमतीचे व रोख रक्कम २ लाख २१ हजार २४५ रूपये असा एकून २ कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रूपये किंमतीचा माल चोरुन नेला.

या प्रकरणी दिशा नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक उमेश भानुदास जाधव, रा. गवळी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर यांनी दि. ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम ३१६ (५), ३३१ (४), ३०५, ६१ (२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news