नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील चोरी, दरोडे आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नांदेड पोलिस दलाने मध्यरात्री जिल्ह्यात एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यात अनेक तडीपार, हद्दपार, मोक्कामधील अनेक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. तर काहीवर कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात १४ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्यापर्यंत (एकूण ४ तास) अत्यंत गोपनीयतेने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार/हद्दपार आरोपी, हिस्ट्रीशिटर आणि फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांची कसून तपासणी करण्यात आली.
















