बोगस पीक विमा काढल्यास पाच वर्षे होणार ‘ब्लॅकलिस्ट’; डिजिटल पीक नोंद बंधनकारक

अमरावती : प्रतिनिधी
पंतप्रधान पीकविमा सुधारित योजनेसाठी आता ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ बंधनकारक असेल. तसेच, विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तर अर्जदाराला पीक विम्यासह ‘नमो शेतकरी महासन्मान’ सारख्या कृषी विभागाच्या सर्व योजनांमधून पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. पीक विमा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर (१० गुंठे) इतकी मर्यादा घालण्यात आली आहे. ई-पीक पाहणी किंवा डिजिटल क्रॉप सर्वेक्षणामधील पीक आणि भरलेल्या अर्जातील पीक/क्षेत्रात तफावत आढळल्यास अर्ज रद्द होतो आणि भरलेला हप्ता जप्त केला जातो. कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणा-यांना आता पीक विमा संकेतस्थळावर ‘रजिस्टर्ड भाडेकरार’ अपलोड करावा लागेल.

पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले तरीही विम्याच्या निकषात जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अपात्र ठरले. त्यामुळे त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जुने पाच निकष पुन्हा लावण्याची मागणी होत आहे. विमा हप्ता म्हणून शेतक-यांना केवळ दोन टक्के, रब्बी पिकांसाठी दीड टक्का, तर नगदी पिकांसाठी पाच टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. उर्वरित विमा प्रीमियम शासनाकडून भरला जाणार आहे.

तफावत आढळल्यास सर्वेक्षणातील नोंदच अंतिम
विमा घेतलेले पीक व डिजिटल पीक सर्वेक्षण नोंदविलेले पीक यात तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास डिजिटल पीकविमा सर्वेक्षणात नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

तर पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट
बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतक-याला पीकविमा योजनेसह कृषी विभागाच्या विविध डीबीटी योजनांपासून पाच वर्षांसाठी अपात्र ठरविले जाईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41

Latest news