डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठाला १४ लाखांना गंडविले

नांदेड : प्रतिनिधी
डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १४ लाख १५ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी नांदेड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून ते ४ जुलै २०२६ या कालावधीत पवननगर, तरोडा (खुर्द) येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी संभाजी तुंबलवाड वय ६७यांना काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. आरोपींनी स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या नावाचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा बनाव रचला. तसेच डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. या भीतीपोटी फिर्यादी तुंबलवाड यांच्याकडून आरोपींनी विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण १४ लाख १५ हजार रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी प्रिया मंडम, अमितकुमार चौधरी, संदीप यादव, प्रदीप जयस्वाल तसेच मोबाईल क्रमांकधारकांसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेची विविध कलम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41

Latest news