निरोगी बालक हीच सशक्त समाजाची पायाभरणी 

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
निरोगी बालक हीच सशक्त समाजाची पायाभरणी असून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा आरोग्यविषयक मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या तथा समाजकल्याण समितीच्या सदस्या सौ. तुळसाबाई लोंढे यांनी केले.
    विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहून त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी, यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त येरोळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या तथा समाजकल्याण समितीच्या सदस्या सौ. तुळसाबाई लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी सवयी आणि जंतसंसर्गापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जंतनाशक गोळ्यांच्या नियमित सेवनामुळे मुलांमधील रक्तक्षय व कुपोषणाचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या मोहिमेत विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम सागडे, मुख्याध्यापक धम्मपाल निचळे, आरोग्य सहाय्यिका फातिमा शेख, गटप्रवर्तक शिवगंगा येरोळकर, आशा स्वयंसेविका संध्या जाधव, महादेवी लोंढे, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news