Homeमुख्य बातम्यानीट पीजी कट-ऑफमध्ये मोठी कपात; १८ हजार रिक्त जागांसाठी ० ते ७ पर्सेंटाइलधारकांना मिळणार...

नीट पीजी कट-ऑफमध्ये मोठी कपात; १८ हजार रिक्त जागांसाठी ० ते ७ पर्सेंटाइलधारकांना मिळणार प्रवेश!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-पीजी परीक्षेच्या पात्रता गुणांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. तब्बल १८ हजार जागा रिक्त राहिल्याने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने कट-ऑफ चक्क ‘शून्य’ आणि ‘७’ पर्सेंटाइलपर्यंत खाली आणला आहे. या निर्णयामुळे आता ८०० पैकी वजा ४० (-४०) गुण मिळवणारे उमेदवारही एमडी आणि एमएस कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.

या बदलामुळे आता १०३ गुण मिळवणारे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आणि ९० गुण मिळवणारे दिव्यांग उमेदवार तिस-या फेरीसाठी पात्र ठरतील. सुरुवातीच्या नियमांनुसार खुल्या प्रवर्गासाठी किमान २७६ आणि दिव्यांगांसाठी २५५ गुणांची आवश्यकता होती.

पदव्युत्तर (एमडी/एमएस) वैद्यकीय शिक्षणाच्या जागा रिक्त राहू नयेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दोन फे-यांनंतर अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत, तसेच काही नवीन जागांची भर पडली आहे. या जागा भरण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नेमका बदल काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार बोर्डाने हा निर्णय घेतला. यापूर्वी प्रत्येक प्रवर्गासाठी किमान गुणांची अट होती. मात्र, आता पुढील प्रमाणे बदल करण्­यात आला आहे.
– एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्ग : पात्रता निकष ० (शून्य) पर्सेंटाईल करण्यात आला आहे.
– खुला प्रवर्ग : कट-ऑफ ५० पर्सेंटाईलवरून थेट ७ पर्सेंटाईलपर्यंत कमी केला आहे.
– दिव्यांग उमेदवार : कट-ऑफ ४५ पर्सेंटाईलवरून ५ पर्सेंटाईलवर आणला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR