परभणी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

परभणी : भारतीय हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी दि.३० जुलै रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाट व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विशेष सतर्कता व खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. नदी, नाले, ओढे, पूल, बंधारे तसेच सखल व पूरप्रवण भागात जाणे टाळावे. पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यावरून अथवा पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दूरध्वनी क्र. ०२४५२-२२६४००, टोल फ्री क्र. १०७७ तसेच संपर्क अधिकारी पवन खांडके यांच्याशी मो. ९९७५०१३७२६ या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी घाबरू नये सतर्क रहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news